Uncategorized

विलासराव घुमरे यांनी प्रतिकुल परिस्थितीतुन शुन्यातुन विश्व निर्माण केले त्यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी – प्रा डॉ.राजेंद्र दास सर

करमाळा प्रतिनिधी विलासराव घुमरे सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करून यशस्वी जीवन कसे जगावे याचे उत्तम उदाहरण असून युवा पिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ राजेंद्र दास सर यांनी व्यक्त केले .विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त यशवंत परिवार करमाळा यांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला .या सत्कार संमारंभास बदलापुरचे उद्योजक पंढरीनाथ साटपे, प्राचार्य साहित्यिक शिवाजीराव वाघमारे ,डॉक्टर महेंद्र नगरे,विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंडसर, प्राचार्य एल.बी ,पाटील,वरिष्ठ उपप्राचार्य अनिल साळुंकेसर उपप्राचार्य संभाजी किर्दाक सर ,प्रसिध्द वक्ते संजय कळमकर,यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील उद्योजक रवींद्र पवार, प्रा. शिवाजीराव बंडगर,शहाजी देशमुख सर,आदिनाथचे मा.संचालक नानासाहेब लोकरे ,आदिनाथ कारखान्याचे मा चेअरमन धनंजय डोंगरे,मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर,आदिनाथचे मा. व्हाईस चेअरमन रमेश कांबळे, आदिनाथ कारखान्याचे मा.संचालक दत्तात्रय सोनवणे,मकाई कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ कल्याण सरडे सुनील बापू सावंत ,महावीर साळुंखे, मानसिंग खंडागळे फारुख जमादार अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था करमाळा अध्यक्ष उद्योजक संतोष काका कुलकर्णी साहित्यिक भीष्मा चांदणे दादासाहेब पिसे,गोपाळराव सावंत, विजयराव पवार पत्रकार विवैक येवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे नासीर कबीर अशोक नरसाळे , डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, आण्णा काळे,जयंत दळवी , सुहास घोलप,विशाल घोलप अशोक मुरुमकर उपस्थित होते .
पुढे बोलताना ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दाससर म्हणाले की सरांनी आता आत्मचरित्र लिहायला हवे जीवनामध्ये आणि संकटावर मात करून राजकारणात समाजकारणात अनेकांना मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावून त्यांचे जीवन समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले आहे. भावी पिढीला या गोष्टी समजण्यासाठी समाजाला संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल कशी करावी याची दिशा समजणार आहे .समाजामध्ये वावरताना कोणत्या गोष्टीचे भान असावे मानसे कशी जपावी माणसांना जोडून जीवनात ध्येय कसे गाठायचे याची प्रेरणा आत्मचरित्रातून मिळणार आहे. कारण कुठल्या गोष्टीची सुरुवात शुन्यातून झाली तरी नंतर त्याचे स्वरूप  व्याप्ती मोठी होते  हे विलासच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते.जीवनामध्ये अनेक मित्र मिळवणे प्रत्येकाला त्याच्या गुणवैशिष्ट्यासह स्वीकारून मैत्रीचे बंध कायम ठेवून प्रत्येकाला आपल्याकडे जे काय आहे त्यातून दुसऱ्याला काहीतरी द्यावे व त्यांचे जीवन समृद्ध करावे ही गोष्ट प्रत्येक माणसाला जमतेच अशी नाही ज्यांना जमते तेच मार्गदर्शक किंगमेकर दिशा देणारे दीपस्तंभ होतात. विलास अनेकांचा मार्गदर्शक आधारस्तंभ आहे पण आमच्यासाठी तोच विलास आहे .गरीब श्रीमंत जात धर्म असा कुठलाही भेद त्याच्याकडे नाही. जो मनापासून आपला वाटला ज्यांनी एकमेकाला जाणून मैत्रीचे नाते कायम जपले आहे.सरांच्या सहवासात आलेला माणुस सरांचा कायम होतो.माणसे जपण्याच्या त्यांच्या गुणामुळे समाजकारण राजकारणात त्यांनी कायमचे मार्गदर्शक म्हणुन त्यांचे स्थान कायम असुन असा मित्रांना कायम सहकार्य करून सुख दुखात साथ देणारा आपला मित्र असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी रक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये एकशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले दुपारी एक वाजता प्रसिद्ध होते अभिषेक कळमकर यांची व्याख्यान व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भाव देण्यासाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .या कार्यक्रमांमध्ये यशवंत परिवाराच्या वतीने विलासराव घुमरे सर यांचा केक कापून हार श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होम मिनिस्टर फेम आर जे अक्षय ,अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या उपस्थितीमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम मोठ्या दिमाखामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला करमाळा शहर व तालुक्यामधील हजारो महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमातही विलासराव घुमरे त्यांच्या सहचारिणी धर्मपत्नी जयश्रीताई घुमरे चिरंजीव ॲड विक्रांत घुमरे आशुतोष घुमरे,स्नुषा रूपालीताई घुमरे कोमलताई घुमरे ,नातू राणा, रूवी, अन्वी नातवंडे यांच्यासह त्यांचा सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला .होम मिनिस्टर या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या प्रत्येक भगिनीस भेटवस्तू देण्यात आले असून होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेत्याचे बक्षीस वितरणही यावेळी संपन्न झाली तसेच आई कमलाभवानीला सात पैठण्या देऊन सात पैठणी लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आल्या असून पैठणी महिला विजेत्यांना देण्यात येणार आहे. विलासराव घुमरे सरांचा यांचा वाढदिवस यशवंत परिवार मित्र परिवाराच्यावतीने मोठ्या उत्साहात व आनंदात संप्पन झाला. यशवंत परिवार यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रदीप मोहिते, सूत्रसंचालन प्रा विष्णु शिंदे यांनी तर आभार प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत परिवार सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.सरांच्या वाढदिवसाला करमाळा शहर तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील नागरिक मान्यवर यांनी दिवसभर त्यांना भेटी देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.त्यामुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले असून सरांनी योग्य परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे येत्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये किंगमेकर असणारे विलासराव घुमरे सर कुठली भूमिका घेतात यावर येणाऱ्या निवडणुकीचा निकाल त्यांच्या बाजूने ठरणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group