Thursday, September 17, 2026
Latest:
Uncategorized

ग्राहक पंचायतचे भालचंद्र पाठक सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी  मध्य महाराष्ट्र ग्राहक पंचायत उपाध्यक्ष ज्यांनी ग्राहक पंचायत च्या कामासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अशी ग्राहक पंचे भालचंद्र पाठक सर यांचे आकस्मात हृदयविकारांनी दुःखद निधन झाले ग्राहक पंचायत दिन साजरा होत असताना याच दिवशी श्री पाठक सर यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे आपल्या सहकार्याला बोलत असतानाच त्यांना ह्रदय उकाराचा तीव्र झटका आला व त्यानंतर खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले पण उपचार सुरू असतानाच पाठक सर यांचे निधन झाले करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी काम केले सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ग्राहक पंचायत चे काम अविरतपणे सुरू ठेवले होते ग्राहक पंचायत च्या कार्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे मागे काही वर्षांपूर्वी त्यांना अटॅक आला एन्जोप्लास्टी झाल्यामुळे त्यांना नवजीवन मिळाले होते त्यांच्या मागे पत्नी दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे . मनमिळावू प्रेमळ अजात शत्रू व्यक्तिमत्व असलेले पाठक सर यांच्या आकस्मिक दुखःद निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!