रश्मी बागल यांच्या मागणीस यश. रामवाडी कावळवाडी जिंती गेट रस्त्यास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी
करमाळा (प्रतिनिधी)करमाळा मतदारसंघातील विविध रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी देण्याची मागणी भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
करमाळा तालुक्यातील भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी बागल यांनी करमाळा मतदार संघातील विविध विकास कामांचा मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करून नवीन कामांना मंजुरीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुक्यातील देवळाली ते वीट रस्ता,पांडे ते अर्जुन नगर रस्ता,करंजे ते भालेवाडी रस्ता,इ.जि.मा.१२ ते वांगी नंबर दोन रस्ता,रायगाव ते राखवाडी रस्ता, रामवाडी व कावळवाडी ते जिंती रस्ता हे रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने खराब झाले असून त्यांची अवस्था दयनीय झाल्याने मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला तात्काळ मंजुरी मिळून संबंधितांना आदेश देण्याची मागणी केली होती.याचीच दखल घेत रामवाडी ते जिंती रेल्वे गेट दरम्यानच्या मार्गास मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे.सध्या तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस जाऊन संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन तालुक्यातील अडचणी मार्गी लावण्याचा प्रयत्न रश्मी बागल यांच्या माध्यमातून केला जात आहे.
