Uncategorized

कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरू… करमाळा तालुक्यात 22 डिसेंबर रोजी पोहोचणार पाणी- आमदार संजयमामा शिंदे 


करमाळा प्रतिनिधी
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील नियोजनाप्रमाणे कुकडी प्रकल्पातून रब्बी आवर्तन दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी (आज)सुरू होणार असून सदर पाणी 7 दिवसाच्या अवधीनंतर करमाळा तालुक्यात पोहोचेल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सदर रब्बी आवर्तन 40 दिवस चालणार असून त्यामध्ये करमाळा तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी 7 दिवसाचा वहन कालावधी अपेक्षित आहे. या पाणी वाटप नियोजनानुसार करमाळा तालुक्यासाठी 10, कर्जत तालुक्यासाठी 12, श्रीगोंदा तालुक्यासाठी 8,तर नारायणगाव साठी 3 दिवस पाणी मिळेल. या पाण्यामुळे करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव, सावडी आदी गावातील तलाव, बंधारे भरण्यास मदत होणार आहे.
सदर आवर्तनाचा फायदा रब्बी हंगामातील पिकांसाठी होणार असून जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्नही सुटण्यासही मदत होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group