करमाळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घोटी शाळेचे घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी
दि .१४ / १२ / २०२३ रोजी वीट येथे तालुका स्तर क्रीडा स्पर्धा मा . विस्तार अधिकारी जयवंत नलवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या .
सदरच्या स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा घोटीने नेत्रदिपक असे यश मिळवले . *लहान गट मुले व मुलींनी लंगडीत तालुक्यात प्रथम क्रमांक* मिळवला तर *मुले/मुली लहान गट कबड्डी व खो – खो तालुका उपविजेता* ठरला . तसेच *बाळ कृष्ण राऊत याने 200 मी. धावणेत दुसरा क्रमांक* मिळवला . या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब, विस्तार अधिकारी श्री नलवडे साहेब, विस्तार अधिकारी श्री. निळ साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री . शिवाजी फरतडे सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . प्रमोद म्हेत्रे तसेच उपाध्यक्ष श्री .नवनाथ राऊत सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना जिल्हास्तर स्पधेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
