संतांनी समाजात समतेचा व समानतेच्या विचार रूजवण्याचे कार्य केले:- ह.भ.प.आप्पा महाराज जाधव
करमाळा प्रतिनिधी वारकरी संप्रदायातील संतांनी समाजात समतेचा व समानतेचा विचार रूजवण्याचे कार्य केले असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख ह.भ.प. आप्पा जाधव महाराज उंबरगे यांनी शेटफळ येथे चैत्र सप्ताहाच्या सांगता समारंभ कार्यक्रमात बोलताना केले पुढे बोलताना ते म्हणाले की समाजात जात,वर्ण लिंग यावरून भेद केला जात असल्याच्या काळात ‘सकळांशी येथे आहे अधिकार आसे कलीयुगी उद्धार हरिच्या नामे’ आशा प्रकारच्या अभंगांची रचना करून वारकरी संप्रदायातील संतांनी समाजात समतेचा व समानतेच्या शिकवण दिली आप्पासाहेब वासकर महाराज फडाच्या वतीने शेटफळ येथे चैत्र हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विलास अरनाळे(देहू)शषांगर बोबडे( इंदापूर) रामभाऊ निंबाळकर (बिटरगाव) आनंद जाधव (भालेवाडी)काका भोसले (कंदर) नामदेव वासकर (साकत) यांच्या किर्तनाचे तर हर्षल सरडे( चिखलठाण) कुकडे महाराज (शेलगाव) नेर्लेकर आबा (चिखलठाण) बाळासाहेब निळ( निमगाव) अनिल महाराज (गंगावळण) विलास राठोड (जेऊर )यांच्या प्रवचनाचे तसेच काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन हरिपाठ आसे कार्यक्रम झाले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आप्पा जाधव महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.
