जेऊर चोंडी आष्टी रेल्वे मार्गास भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी- शाम सिंधी
करमाळा प्रतिनिधी जेऊर चोंडी आष्टी रेल्वे मार्गास भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपा करमाळा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी यांनी अप्पर मंडल रेल्वे अधिकारी श्री शैलेंद्रसिंह परिहार रेल्वे विभाग सोलापूर यांना देण्यात आले .. निवेदन म्हटले आहे की सोलापूर जिल्ह्यातील जेऊर चौंडी आष्टी रेल्वे मार्गासाठी सरकारने 2017- 18 रोजी सर्वेक्षण मंजूर करून सर्वेक्षण सुरू केले होते नंतर कुठल्याही आर्थिक वर्षामध्ये रेल्वे मार्गावर कसलेही आर्थिक तरतूद केलेली नाही जेऊर चोंडी आष्टी रेल्वे मार्गात सर्वेक्षण काम पूर्ण होऊन लवकरात लवकर भूसंपादन करावे त्यामुळे सोलापूर अहमदनगर शंभर किलोमीटर अंतर कमी होणार आहे चोंडी हे गाव राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असून जयंती व पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणात राज्यातून व इतर राज्यातून नागरिक येत असतात चोंडी बरोबर या संपूर्ण परिसराचे पर्यटना बरोबर शेती व औद्योगि व्यवसाय विकासासाठी चालना मिळणार आहे जेऊर चौंडी आष्टी या मार्गासाठी लवकरच भारतीय जनता पक्षाचे शिष्ट मंडळ रेल्वेमंत्री मा अश्विन वैष्णव तसेच मा.रावसाहेब दानवे पाटील रेल्वेमंत्री यांना भेट घेऊन निवेदन देणार आहोत ..
तरी या मार्गाचे सर्वेक्षण, संपादन करून या रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात भरीव निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी केली यावेळी श्री परीहार म्हणाले की रेल्वे विभागाच्या संबंधित विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत कळविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी प्रदीप देवी, नरेंद्रसिंह ठाकुर, महेश वैद्य, कृष्णा कांबळे आदि जण उपस्थित होते..
