करमाळा शहरातील फंड गल्ली येथील सौ.छाया आप्पासाहेब झाकणे यांचें दुखःद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील फंड येथील सौ.छाया आप्पासाहेब झाकणे ६५ यांचे सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपश्चात दोन मुले एक मुलगी पुतणे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी साडेपाच वाजता फंड गल्ली येथील राहत्या घरापासून निघणार आहे.झाकणे मेसचे मालक आप्पासाहेब झाकणे यांच्या धर्मपत्नी होत्या. संकटाचा सामना करीत संघर्षमय जीवनात सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या अंत्यत प्रेमळ हसतमुख स्वभावाच्या असणाऱ्या छायाकाकु यांच्या अचानक आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
