Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक शशिकांत अवचर सर यांचा आदर्श उपक्रम

करमाळा प्रतिनिधी /प्रवीण अवचर
मांगी येथील पंचशील बुद्ध विहार कमिटीचे सदस्य यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राध्यापक आयु शशिकांत अवचर यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समाजात आदर्श निर्माण केलेला आहे .त्यांनी या जयंतीनिमित्त मांगी येथील जिल्हा प्राथमिक शाळा इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक मोफत भेट दिलेली आहेत..
आंबेडकर जयंती साजरी करत असताना प्रामुख्याने त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचवणे खूप महत्त्वाचे असून तोच आदर्श शशिकांत सर यांनी समाजाला घालून दिलेला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” त्याचप्रमाणे आपल्या समाजाने शिक्षणात जास्तीत जास्त प्रगती करून सर्वोच्च पदावर ती विराजमान व्हायला हवे यासाठी शिक्षण घेणे खूप महत्त्वाचे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम शशिकांत अवचर सरांनी या माध्यमातून केलेले आहे . जयंती साजरी करत असताना समाज बांधवांनी वर्गणीचा पैसा इतर ठिकाणी व्यर्थ घालवण्यापेक्षासामाजिक बांधिलकी जपण्यावरती भर द्यायला हवा जेणेकरून आपल्या समाजातील गरीब व दुर्लक्षित मुलांना मुलींना शिक्षणासाठी याचा फायदा होईल शशिकांत अवचर सर हे पूर्वीपासूनच सामाजिक बांधिलकी जपत “समाजाचे आपण काही देणे लागतो” या दृष्टिकोनातून गरीब गरजू विद्यार्थ्यां साठी मोफत शिकवणी वर्ग सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे मुक्या प्राण्यांवरती त्यांचे विशेष प्रेम असून भटके आजारी श्वानावरती ते मोफत उपचार करतात . आजपर्यंत त्यांनी अनेक मुक्या प्राण्यांना जीवदान दिलेले आहे .त्यांच्या या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group