मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देणारे एकनाथ शिंदे. मराठा समाजाचे एकमेव मुख्यमंत्री-राहुल कानगुडे
करमाळा प्रतिनिधी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देणारे एकनाथ शिंदे. मराठा समाजाचे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे मत शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी व्यक्त केले .मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण लढा उभारला होता मराठा समाजाला आरक्षण मिळून गेले शिवाय स्वस्त बसणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या मराठा समाजाचे लोकनेते जरांगे पाटील यांच्या आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे .मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणून समाजाचे खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे.महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार अशी शप्पथ घेतली होती. तो शब्द पाळून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला ओबीसी मधूनच कुणबी म्हणून आरक्षण दिले आहे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून दिल्याबद्दल देवळाली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जयघोषात मनोज जरांगे पाटील जिंदाबाद म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो असा नारा देत देवळाली येथे मराठा समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्याची आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देऊन आरक्षण देण्याचा शब्द पाडल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी देवळाली येथील मराठा समाज बांधव बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
