वाशिंबे येथील बापू बोबडे वस्ती ते संजय गायकवाड वस्ती या लोकवर्गणीतून होणाऱ्या रस्त्याला प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनकडून चाळीस हजार रुपयांची मदत
वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे येथील बापू बोबडे वस्ती ते संजय गायकवाड वस्ती हा रस्ता मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे.रस्त्यावर जाणे-येणे ही सर्व सामान्याला अवघड होवून बसले आहे.रस्त्याला पडलेले खड्डे,पाईप लाईनच्या चाऱ्या यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.यापूर्वी लोकांनी लोकवर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती केली आहे.प्रा.झोळ यांनी या ठिकाणी भेट देऊन शेतकर्यांच्या अडचनी जानुन घेतल्या.शेतकर्यांच्या मागणीनुसार ऊर्वरीत रस्त्यासाठी प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनच्या वतीने रस्त्यासाठी ओढ्याच्या ठिकाणी पंधरा हजार रुपयांच्या दोन पाईप व पंचवीस हजार रोख रक्कम देण्यात आली.तसेच डोंबाळे वस्ती तलाव येथील रस्त्यासाठी
आठ हजार रुपये किमतीचे दोन पाईप देण्यात आले.यावेळी शेतकर्यांनी अंबालिका शूगर,बारामती अँग्रो कारखान्यांकडून मदतीचे आवाहन केले आहे.या प्रसंगी प्रसंगी मथीन शेख,रणजित शिंदे,पत्रकार सुयोग झोळ,नारायण झोळ,विकास झोळ,आण्णा झोळ,संजय शिंदे,उपस्थित होते.
