Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

आम्हाला घर देता का घर नेत्यांनो मदारी समाजाकडे कधी लक्ष देता शासनाकडुन आम्हाला न्याय कधी मिळणार- उमर मदारी

करमाळा प्रतिनिधी हातावरचे पोट आमचा पाठीवर आमचा संसार खायला कार आणि भुईला बार अशी आमची समाजाची परिस्थिती झाली आहे. आमचा मदारी समाज सापाला पकडणे सापाची खेळ दाखवणे यावर कसा बसा तरी उदरनिर्वाह करतो. कशीतरी पोटाची खळगी भरून आम्ही जीवन जगत आहे. शासन आमच्याकडे कधी लक्ष देणार आम्हाला घर देता का घर अशी खंत उमर मदारी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष उमर मदार यांनी व्यक्त केले.आमच्या पिढ्याने पिढ्या आम्ही उघड्यावर राहत असून अतिक्रमण भागातल्या मौलाली नगर येथे आमच्या समाजाची माणसे राहत आहे. अतिक्रमण जागेत राहत असल्यामुळे शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा दिली नाही. राजकारणी लोकही आमच्याकडे मते मागण्या पुरती येतात. निवडणुकीपुरते आम्हाला आश्वासने देतात ना आम्हाला घराचा पत्ता आहे ना उदरनिर्वाहाचे साधन आमचे जीवन म्हणजे मोठी संघर्ष यात्रा आहे. आम्हाला प्रतिष्ठा नाही उलट आमच्या प्रश्नांचे अडचणीचे राजकारणी लोकांना हसू येते. आमचा समाज अशिक्षित असल्यामुळे कोणी कुणाच्या पाठीमागे लवकर जात नाही की नसल्याने आमचे कुठलेही काम होत नाही. माझे आयुष्य माघारी समाजाच्या प्रश्नासाठी जगण्यात गेले आहे. माझे हर्नियाची ऑपरेशन झाले असून त्याला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आला आहे माझी परिस्थिती नसतानाही लोकांकडून उसने पासने घेऊन माझ्या घरच्यांनी माझा इलाज केला आहे. मदारी समाजाचा अध्यक्ष असताना माझी परिस्थिती अशी तर समाजातल्या लोकांची परिस्थिती काय याचा विचार मायबाप सरकारने व प्रशासनाने करून आम्हाला निदान घर व उदरनिर्वाहासाठी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच मायबाप सरकारकडून अपेक्षा असल्याचे उमरमदारी यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group