करमाळा

क.न.प तर्फे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप शिंदे व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील करमाळा नगरपरिषदेतील पाच कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पालिकेच्या वतीने नुकताच संपन्न झाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये प्रदीप नामदेव शिंदे, रमेश गणपत शिंगाडे, राजेंद्र हरिश्चंद्र माने, बाळू बाबूराव शिंदे, श्रीमती इंदुमती सैदू शिंदे यांचा समावेश असून, त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी, मित्र परिवार इ. आपल्या भावना व्यक्त करताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कुटूंबियांनी चांगले सांभाळावे, त्यांची काळजी घ्यावी व त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे पुढील उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगू द्यावे. त्यांना कुठल्याही प्रकारचे दुःख देवू नये; असे मत व्यक्त केले. करमाळा नगरपालिकेतून पाच कर्मचारी सेवानिवृत्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे; असे संभाषणातून दिसून आले. याप्रसंगी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांचा शाल, फेटा, पूर्ण पोशाखासहीत सत्कार केला. तसेच त्यांच्या कामाचे कौतूक करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यालयीन प्रमुख दिगंबर देशमुख, दत्तात्रय घोलप, जब्बार खान, समीर नदाफ, विनोद राखुंडे, दत्तात्रय बदे , फिरोज शेख, विशाल मुळे , निखील गुरसाळे, राजेंद्र झाडबुके, अभय देशपांडे, बाळासाहेब महाडिक, प्रदीप चौकटे यांचेसह पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार इसाक पठाण यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group