आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!” उद्या वांगी नंबर 3 मध्ये संपन्न होणार…
करमाळा. प्रतिनिधी
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे.
तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की, सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
वांगी नंबर 3 येथील शिबिरांमध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक – 14/06/ 2022 रोजी सकाळी 9. 30 ते 5.30
स्थळ- जि प शाळा.वांगी नं. 3.
सहभागी गावे – वांगी नं. 1, वांगी नं 2, वांगी नं 3, वांगी नं 4 , भिवरवाडी , सांगवी नं1, सांगवी नं 2, बिटरगाव वांगी, कविटगाव, पांगरे, भाळवणी, ढोकरी
