शासकीय कामांसदर्भात अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी – शहर व तालुक्यातील नागरिकांना राज्य शासनाच्या कुठल्याही स्थानिक कार्यालयांमध्ये त्यांच्या रीतसर कामांमध्ये अडचणी येत असतील,विलंब
तसेच अडवणूक होत असेल तर या अडचणींचे निवारण
होण्यासाठी संबंधित नागरिकांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या करमाळा संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
सर्वच शासकीय कार्यालयांमार्फत सामान्य जनतेच्या असलेल्या कामांचा विनातक्रार व योग्य त्या विहित वेळेमध्ये निपटारा होणे हे नियमाला अनुसरून अपेक्षित असते.तसे होत नसेल तर नागरिकांनी आमदार संजयमामा करमाळा कार्यालय स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर(मो.९९२२८१६६५५),तसेच सुजित बागल(मो.९४२०५४४१४१),विवेकयेवले(मो.९४२३५२८८३४), आशपाक जमादार(मो.८८५६०५४८४४),तुषार शिंदे(मो.९५०३२३३४७६) व कायदेशीर कामे,अडचणींबाबत ऍड. अजित विघ्ने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
