भक्तिमय वातावरणात करमाळ्यात प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत रामनवमी साजरी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सुभाष चौक येथे श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सकाळी असंख्य महिलांच्या वतीने श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करण्यात आले त्यानंतर दुपारी ठिक १२ वा १० मिनीटांनी श्रीराम जन्म झाला यावेळी कारसेवकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी सुभाष चौक येथे आकर्षक सजावट करून लायटिंग करण्यात आली होती.भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जयकार करण्यात आला.
दुपारी चार वाजता खोलेश्वर मंदिर किल्ला वेस येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.यावेळी राम रथ, प्रभू श्रीरामांची भव्य आकर्षक कट आऊट, पारंपारिक वाद्य पथक, हजारो महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. डीजेच्या दणदणाटात व विद्युत रोषणाईचा झगमगाट, लेझर शो व तरुणाईच्या प्रचंड गर्दीत मिरवणूक उत्साहात पार पडली.
मिरवणुकीची सांगता सुभाष चौक येथे हजारो तरुणांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा ने झाली.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
