Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

जयवंतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने कंदर येथे शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कंदर येथीलजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने 200 विद्यार्थ्यांना दप्तर ,पाणी बाटली इत्यादी सुविधायुक्त साहित्य असलेली शालेय किटचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे होत्या .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप , गटविकास अधिकारी मनोज राऊत , पोलीस निरीक्षक विनोद घुगे आधी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी केले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत घेण्यात आले तद्नंतर प्रशालेच्या आवारात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले .जयवंतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने वार्षिक नियोजनानुसार प्रतिवर्षी गरीब कुटुंबीयांना दिवाळी शिधा किट वाटप ,अनाथ मुले दत्तक घेणे व त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची विवाहापर्यंत जबाबदारी ,मोफत वैद्यकीय ॲम्बुलन्स सेवा ,शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी वयोवृद्ध अनाथ गरीब दिनदलितांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासह अन्य विधायक उपक्रम सातत्याने चालू असतात . जगताप प्रतिष्ठानचे या उपक्रमाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे गटविकास अधिकारी राऊत ,पोलीस निरीक्षक घुगे यांनी कौतुक करत शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्याची हमी दिली .याप्रसंगी श्रीमती ठोकडे ,शंभूराजे जगताप , घुगे व राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमास कंदरचे सरपंच मौला साहेब मुलांनी ,उपसरपंच अमोल भांगे ,ग्रामविकास अधिकारी दीपक मंजुळे यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव राखुंडे ,खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब लबडे , महादेव डुबल, आदिनाथ चे माजी संचालक नवनाथ शिंदे ,अमर भांगे , राजकुमार सरडे , कुबेर शिंदे , आरकिले ,सचिन शिंदे ,आबासाहेब सुरवसे ,दीपक मंजुळे ,दीपक घोडकोस ,दिलदार मुलांनी ,आकलाख जागीरदार ,दादासाहेब लोंढे ,कांतीलाल पवार , बाबासाहेब यादव ,दिलावर शेख ,सुहास कदम, नितीन फरतडे ,संभाजी लोंढे ,विजय पवार ,रंजीत पवार ,प्रकाश पवार ,रमेश फरतडे , हनुमंत खबाले,सतिश पवार,भारत पवार ,नागनाथ सुरवसे, वेजिनात गुरव , बाळासाहेब सुतार ,यांचे सह पालक वर्ग शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपतराव सरडे यांनी केले तर आभार जिप शिक्षिका रत्नमाला होरणे यांनी मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group