प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्यावतीने रावगांव येथे मोफत महिला आरोग्य शिबिर संपन्न*
करमाळा प्रतिनिधी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी करमाळा तालुका मार्केट कमिटी च्या संचालिका सरस्वती ताई केकाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्या देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी केकान बोलताना म्हणाल्या की प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान घेतलेला मोफत महिला आरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे . यावेळी सौ वनिता काकडे मॅडम यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले काकडे बोलताना म्हणाल्या की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तेवढे लक्ष देत नाहीत महिला अबला असते असा उल्लेख होत असतो मात्र ज्या महिले मध्ये एका जीवाला जन्म घालण्याची शक्ती असते ती आबला कशी असू शकते त्यामुळे स्त्रियांनी स्वतःमधील शक्ती ओळखून त्या शक्तीला अनुरूप काम करावे त्या आरोग्यविषयक बोलताना म्हणाल्या की महिला कुटुंबाची जबाबदारी पेलवत असताना वेळच्या वेळी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे अल्प वयामध्ये त्यांना विविध आजार जडतात त्यामुळे महिलांनी वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे या आरोग्य शिबिरामध्ये महिलांमध्ये चालताना दम लागणे सांधेदुखी हिमोग्लोबीन थायरॉईड बीपी शुगर कॅल्शियमची कमतरता रक्तदाब इत्यादी प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये पोटाच्या किंवा पाळीच्या तक्रारी गर्भवती महिलांना पोषक आहार व गर्भसंस्कार याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामध्ये १०६ महिलांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी मानले . यावेळी मा. ग्रा.पं . सदस्या अविदा (ताई )कांबळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे संगीता शिंदे निर्मला पवार अनुसया बरडे सकावतलीन शेख मुमताज आतार तसलीम शेख सत्यभामा पवार प्रियंका कांबळे शितल कांबळे राजू पवार विजू पवार गणेश पवार आदी जणांचे या कार्यक्रमास आदी जण उपस्थित होते .
