महिला दिनाच्यानिमित्ताने करमाळा शहरात नगरसेविका सौ.राजश्री माने यांच्याकडून सफाई कामगार महिलांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी महिलादिनानिमित्त करमाळा शहरात सफाई करणाऱ्या महिला कामगारांचा गौरव नगरसेविका राजश्री माने यांच्या हस्ते झाला. मंगळवारी दिनांक ८ मार्च रोजी करमाळा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.राजश्री माने यांच्या नव्याने सुरु केलेल्या कानाड गल्ली जवळील भाजी मंडई येथील संपर्क कार्यालयात हा गौरव सोहळा झाला. यावेळी सर्व सफाई कामगार उपस्थित होते. गुलाबपुष्प व सन्मान पत्र देऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला.गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात सर्व देश घरात बसलेला असताना सफाई कामगार मात्र जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छ करत होते. त्यामुळे त्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. या भावनेतून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे अवश्य आहे,’ असे करमाळा नगर परिषदेच्या नगरसेविका राजश्री माने यांनी यावेळी सांगितले.यावेळी शालन कांबळे, विजया मंडलिक, सविता कांबळे, स्वाती कांबळे, स्नेहल कांबळे, दीपाली आगलावे, कुंकाली करंडे, रुपाली आलाट, मंदा खरात, आलका धेंडे, नीलम आलाट, आशा कांबळे, माया लालबेग, विमल कांबळे, हिरा मेहतर, मुन्नी शेख, शबाना शेख, उल्हासबाई कांबळे, सुशीला कांबळे, सुशीला साळवे, सुंदरा आलाट, नागोबाई कांबळे, शाकुबाई कांबळे, सखुबाई अडसूळ, आदिका कांबळे, कौशल्या लोंढे, सविता करंडे, सुनीता काळे, बीना कांबळे, संगीता भोसले, ललिता निकाळजे, लक्ष्मी आलाट, बेगम कांबळे, पंचशीला भोसले आदी उपस्थित होते.
