करमाळा

मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैन्यदल पोलीस दलातील वीर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ 26 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर- पोलीस निरीक्षक रणजीत माने

करमाळा प्रतिनिधी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैन्यदल व पोलीस दलातील वीर जवानांना आलेल्या वीरमरणाच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी करमाळा तालुक्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे अशी माहिती करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिली आहे.
सदरचे रक्तदान शिबिर हे देश भावना व समाजभावना म्हणून आयोजित केलेले आहे .कारण आज देखील भारतीय सैन्य दल पोलीस दल तसेच सामान्य नागरिकाचा अपघात झाला तरी रक्ताची कमतरता जाणवत आहे.तरी सर्वांना विनंती आहे की सदर रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.. सदरचे रक्तदान शिबिर हे कोणा एकट्याचे नसून ते करमाळा तालुका मध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेले आहे.सदरचे रक्तदान शिबिर आयोजक हे करमाळा तालुका असल्याचे त्यांनी सांगितले आहे..
रक्तदानाचे फायदे खालील प्रमाणे….
1.. रक्तदान केल्यास फ्री मध्ये ब्लड ग्रुप चेक होतो.
2 ..रक्तदान केल्यास रक्तास कोणताही जन्मजात आजार असल्यास तो मोफत समजून येतो… 3..रक्तदान केलेल्या रक्तदात्याला त्याचा तहयात अपघात झाल्यास त्याला लागणारी रक्ताची बाटली जिची किंमत 1600 रुपये आहे ती बाटली त्याला अल्प दरामध्ये उपलब्ध होणार आहे.सदरचे रक्तादान शिबिर हे करमाळा तालुक्यातील …करमाळा शहर पोलीस ठाणे …केम… कंदर …जेऊर.. जिंती… जातेगाव… साडे.. सालसे.. वाशिंबे चौफुला… कोर्टी… हिसरे या भागामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे… तरी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त रक्तदान करून देश कार्य व समाजकार्यास हातभार लावावा असे आवाहन करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!