केत्तुरला संपूर्ण दारुबंदी साठी महिला सरसावल्या जिल्हा पोलिस प्रमुखांसह दारूबंदी खात्याला दिले निवेदन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर येथील महिला मंडळांनी दारूबंदी करीता ग्रामसभेचा ठराव संमत करून सक्षमपणे पाऊले उचलली असुन जिल्हा पोलिस अधिक्षक ( ग्रामिण ) श्री अतुल कुलकर्णी यांचेसह दारूबंदी खाते यांना निवेदन सादर केलेले आहे . गावामधे प्रमुख रस्त्यावर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आसपास उघडपणे बेकायदा दारूचे धंदे सुरू आहेत . शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ महिला मंडळींना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे तसेच तरुण पिढी यामुळे देशोधडीला लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून स्थानिक महिलांनी स्वतः पदर खोचुन संपूर्ण दारू बंदी करणेचा निर्णय घेतला असुन याबाबतची निवेदन देऊन दारू बंदी कमिटी स्थापन केलेली आहे
गावामधे एक देशी दारूचे दुकान असुन देशी दारूचे दुकान देखिल बंद होणे करीता लवकरच महिला मंडळी विशेष ग्रामसभा घेणार आहेत . सर्व दारू विक्रेत्यांना विनंती करून दारू धंदे बंद होणे बाबत कळविणार आहेत.यावेळी सौ कमल पवार , सौ निर्जला नवले , मुक्ताबाई काटवटे , कमलबाई गुंजाळ , प्रियंका पवार , अरुणा साठे , बेबी कनिचे , सोनाली राऊत , रूपाली पवार वैगेरे महिला निवेदन सादर करताना उपस्थित होत्या.
