करमाळयातील दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे डेंगूची लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्याचे जिल्हाधिकारी यांचे महेशदादा चिवटे यांना दिले आश्वासन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश अॕग्रो एजन्सीने मालक शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्योजक महेश दादा चिवटे यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांच्याशी चर्चा करून करमाळ्यातील डेंगूची लाट व सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापारी वर्गाला करमाळा शहरात व्यवसायिकांना रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी या विषयावर चर्चा केली .यावेळी तात्काळ जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर साहेब यांनी उद्यापासून दुकाने रात्री नऊ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देतो तसेच डेंगूची लाट रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देतो असे सांगितले.
