निसर्गप्रेमी प्रतिष्ठानच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण उत्साहात संपन्न*
करमाळा प्रतिनिधी निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा भाजपा महिला अध्यक्ष संगीताताई नष्टॆ,नगरसेवक सचिन घोलप, रामचंद्र दळवी सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे जयंत दळवी,पत्रकार सचिन जव्हेरी,नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुका अध्यक्ष, पत्रकार दिनेश मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.यावेळी निर्माण निसर्ग प्रेमी संस्थेचे सचिव नरेंद्रसिंह ठाकुर,उपाध्यक्ष प्रकाश क्षिरसागर,निलेश माने साहेब,जितेश कांबळे सर,सचिन चव्हाण,आश्विन जव्हेरी,दिनेश क्षिरसागर या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू व देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेत
1) प्रथम – सौ. माया किशोर भागवत
2) द्वितीय – सौ. विजया महादेव चौरे
3) तृतीय – कु.सानिका मल्हारी चांदगुडे
स्पर्धकांची निवड करण्यात आली.
प्रतिष्ठान च्या वतीने निसर्ग आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.या स्पर्धेसाठी वरद हॉस्पिटल चे डॉ.अमोल घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
