राजुरी येथील बागलगटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश .
करमाळा प्रतिनिधी राजुरी तालुका करमाळा येथील तरुण कार्यकर्ते आर. आर. बापू साखरे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे .आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली तालुका माढा येथील फार्महाऊसवर रविवारी 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राजुरी तालुका करमाळा येथील बागल गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे गटात प्रवेश केला . सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे आणि बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी स्वतः फेटा बांधून केला .याप्रसंगी बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे , पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव , आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ , माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी , राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे ,मानसिंग खंडागळे , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , प्रवीण शिंदे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते .राजुरी तालुका करमाळा येथील बागल गटाचे युवक नेते आर .आर .बापू साखरे , माजी सरपंच निवृत्ती साखरे , आत्तम दुरंदे , दत्तात्रय बोबडे , माजी सरपंच संजय सारंगकर , नामदेव बोबडे , मनोज शिंदे ,नंदकुमार जगताप ,भाऊसाहेब सराटे , भाऊसाहेब सारंगकर ,दादा साखरे ,दादा दुरंदे ,अतुल सारंगकर ,नवनाथ मुळीक , सतीश साखरे ,माऊली मोरे , महादेव दुरंदे ,वैजीनाथ साखरे , पांडुरंग बोराटे ,दिलीप गायकवाड, प्रल्हाद शिंदे ,आप्पा निरगुडे , महादेव साखरे, मनोज दुरंदे , आप्पा कचरे , गणेश कामठे , सुनील पाटील ,परशुराम दुरंदे ,संकेत अवघडे ,उदय साखरे ,महादेव आडसुळ , भाऊसाहेब सराटे ,सचिन सरडे , श्रीकांत शिंदे , नामदेव साखरे , सुनील पाटील , लक्ष्मण साखरे , संपत दुरंदे , प्रवीण साखरे , श्रीकांत साखरे , आप्पा टापरे , नाना देशमुख , वैभव साखरे , यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला . प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे आणि बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी सत्कार केला .
