करमाळा

करमाळा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध – मा . नगराध्यक्ष वैभवराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी आपणास जनतेच्या सेवेसाठी शिलेदार म्हणून नेमले आहे . मा . आ . जयवंतराव जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरासह तालुक्यामध्ये स्व . बाळासाहेब ठाकरे , स्व . आनंद दिघे व उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार पोहचू व संपूर्ण तालुका भगवामय करू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट ) यूवा नेते वैभवराजे जगताप यांनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कारास उत्तर देताना केले . ना . एखनाथराव शिंदे हे खऱ्या अर्थाने जनतेचे मुख्यमंत्री असून राज्यातील सर्वसामान्यांसह सर्वांच्या अडीअडचणी सोडवणारं एक स्वयंभू नेतृत्व आहे असे ते म्हणाले . आपला वाढदिवस हा सोहळा नसून नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याचा प्रसंग आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले . नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना शहराचा विकास करण्याचे ध्येय समोर ठेवले . कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून मिळवला . स्वच्छतेच्या बाबत ५ कोटी रुपयांचे बक्षिस मिळवले . शहरात अनेक कामे केलेली आहेत . अजून बरीच कामे करण्यासारखी असून आपण ती पूर्णत्वास नेऊ असे ते बोलले . शहरवासियांनी कोणतेही काम असो तुमच्या अडचणी आपण सोडवू अशी ग्वाही दिली . यावेळी ॲड .नवनाथ राखूंडे यांनी प्रास्ताविक केले . तर शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे , गटसचिव नेते बबन मेहेर , शिवसेना तालुका प्रमुख अनिल पाटील ,सचिव दत्ता शिर्के भाऊसाहेब , प्राचार्य बाळकृष्ण पाटील ,मुख्याध्यापक दयानंद चौधरी , सचिन अब्दुले सर आदींनी मनोगतं व्यक्त केले . या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , नगरसेवक प्रशांत ढाळे , माजी नगरसेवक अजित परदेशी , झनकशेठ परदेशी , नजीर अहमद कुरेशी , गुलाम कुरेशी , अस्लम वस्ताद कुरेशी , बाजार समिती माजी संचालक दादासाहेब लबडे , संचालक मनोज पितळे , परेश दोशी , हनुमंत ढेरे , माजी नगरसेवक सुरेश इंदूरे , हनुमंत फंड , दादाराम लोंढे , डॉ . रोहन कुंभार, शिवसेना शहर प्रमूख संजय शिलवंत , युवासेना प्रमूख चंद्रकांत राखूंडे , बाजार समिती सचिव विठ्ठल क्षिरसागर , संचालक जनार्दन नलवडे , शहाजी शिंगटे , ॲड . एम .डी .कांबळे, रामदास गुंडगिरे , बाळासाहेब बलदोटा ,अमोल जाधव , जोतीराम ढाणे , अमोल परदेशी , गणेश कुकडे , सुधा गवळी , विकास आमृळे , मनोहर गुंडगिरे , शंकर नलवडे ,बाळासो कांबळे ,दादा धाकतोडे , तानाजी कुकडे ,लाला घोडके , रोहीदास आल्हाट , संतोष कारंडे , संजय ढाणे , बळीराम दुधाट ,अन्वर बागवान ,आदीसह व्यापारी असोशियशन चे सर्व व्यापारी , सर्व कॉन्ट्रॅक्टर्स ,महात्मा गांधी विद्यालय , भैरवनाथ विद्यालय चा स्टाफ , नगरपालिका शिक्षण मंडळाचे कर्मचारी ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी, बाजार समितीचे आजी -माजी संचालक , सह खरेदी विक्रीसंघाचे पदाधिकारी , विवीध गावचे कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी व सचिव ,ग्रामपंचायत , पंचायत समिती व जि प चे आजी माजी पदाधिकारी , पत्रकार बंधू इ . सह राजकीय , सामाजिक व वैदयकीय , उदयोग , व्यापार व शैक्षणिक क्षेत्रातील मित्रपरिवार व जगताप प्रेमी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सकाळ पासूनच मित्रपरिवार व कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ होती . सायंकाळी शिवसेनेच्या शहरामध्ये गणेशनगर व सुतार गल्ली येथे शिवसेने च्या शाखा स्थापन करण्यात आल्या .

error: Don\'t try to copy. Content is protected !!