केत्तुर नं-२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामपंचायती तर्फे ॲरो फिल्टरचे पाणी- सरपंच सचिन वेळेकर

करमाळा प्रतिनिधी- मौजे केत्तुर नं-२ ता- करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षकांसाठी येथील ग्रामपंचायतीने ॲरो फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करून सर्व यंत्रणा सज्ज करून पाण्याची सोय केली आहे.या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असुन याप्रसंगी सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, ग्रा पं सदस्य शहाजी पाटील, बबन साळवे, प्रशांत नवले, सागर पवार, दादासाहेब कानतोडे, सोपानदेव खोडवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता कनिचे, ग्रामविकास अधिकारी शरद जगदाळे, पिंटु येडे, गणेश लोभे, मुख्याध्यापक विकास काळे, शाळेतील सहशिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन, ग्रामपंचायतीचे वतीने अनेक लोकोपयोगी कामे प्रगतीपथावर असलेबाबत सरपंच सचिन वेळेकर यांनी सांगितले.


