केम ग्रामपंचायत पासुन ते शिवशंभू वेशीपर्यंत दोन दिवसात या रस्त्याचे काम चालू न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन
केम प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायत पासुन ते शिवशंभू वेशीपर्यंत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हे कळायला मार्ग नाही करमाळा सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्यामध्ये बळी जाण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विचारला जात आहे . करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात या रस्त्याचे काम चालू न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल , असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री दादासाहेब पालवे यांनी दिला आहे . केम शहर कुंकवासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बाजारपेठ ही मोठी असल्यामुळे दळणवळणाची गैरसोय असल्यामुळे व्यापारी वर्गाची मोठी पंचायत होत आहे . शहरांमध्ये रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्ता मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे . या रस्त्याने ये जा करण्यासाठी शाळकरी मुले ग्रामस्थ व महिला यांना खूप त्रास होत आहे . सार्वजनिक बांधकाम खात्याने या मागणीची दखल घेऊन ताबडतोब रस्ता दुरुस्त करावा , अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
