सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचे कार्य प्रेरणादायी- सुभाष काका बलदोटा
करमाळा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचे सामाजिक धार्मिक कार्य प्रेरणादायी आहे असे मत जगताप गटाचे जेष्ठ नेते सुभाष काका बलदोटा यांनी व्यक्त केले. श्रेणिकशेठ खाटेर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जमीलभाई काझी, पत्रकार दिनेश मडके, संकेत खाटेर, वर्धमान खाटेर, विकास लष्कर, गिरीश शहा, विजय बरिदे उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की दिव्यरत्न गोशाळेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात करून करमाळा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात केले आहे .श्रेणिकशेठ खाटेर यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षमय जीवनातून यशस्वीपणे वाटचाल केली आहे. शिक्षणाची आवड असतानाही परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचण आल्यामुळे त्यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन सुरुवातीच्या काळामध्ये प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय करून आर्थिक परिस्थिती सुधारुन स्वबळावर भांडवल उभा करुन महावीर फर्निचर बांधकाम व्यवसायाला लागणाऱ्या सेन्ट्रींग प्लेटचा व्यवसाय करून व्यापार व्यवसायात आपला जम बसवला. व्यापार करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम केल्यामुळे सर्व क्षेत्रांत त्यांनी मोठा मित्र परिवार निर्माण झाला आहे. करमाळा तालुक्यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले असून राम कथा, भागवत कथा, शिवपुराण कथा अशा विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करून करमाळा तालुक्यातील नागरिकांनी अध्यात्मिकदृष्टया सप्पंन करण्याचे काम त्यांनी केले आहे. निरपेक्ष निस्वार्थ भावनेने काम केल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या धर्मपत्नी संगीताताई खाटेर यांना बहुमताने निवडून दिले आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये तपश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबीर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. गोरगरीब नागरिकांना कोरोना महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते अशा परिस्थितीमध्ये मोफत ऑक्सिजन पुरवठा करून अनेक गोरगरीब नागरिकांना जीवनदान देण्याचे काम त्यांनी केले आहे. सामाजिक कार्याचा वसा जपत उद्योग व्यवसायात भरारी घेऊन श्रेणिकशेठ खाटेर यांनी राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्तृत्व दातृत्व ही भावना त्यांच्याकडे असल्यामुळे लक्ष्मी व सरस्वती एकाच ठिकाणी नांदत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. कौटुंबिक जीवनातही सुखी-समाधानी आयुष्य जगत असून वर्धमान व संकेत दोन्ही मुले उच्च विद्या विभूषित असून संकेत व वर्धमान आपल्या वडिलांचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत. उद्योग व्यवसाय सामाजिक कार्य करत असताना जोडलेला मित्रपरिवार विविध गटातील नेते कार्यकर्ते यांचा असलेला स्नेह जिव्हाळा हे त्यांच्या यशाचे गमक आहे.श्रेणिकशेठ खाटेर यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध गटातील नेत्यांनी श्रेणिकशेठ खाटेर यांचे अभिष्टचिंतन केले असून त्यांचा वाढदिवस विविध पक्षातील मान्यवरांच्या सत्कारामुळे विशेष गाजला आहे. श्रेणिकशेठ खाटेर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राजकीय वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा.