सावंतगटाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त सावंत गटाच्या वतीने सावंत गटाचे युवा नेते सुनील बापु सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रम प्रसंगी जातेगावचे माजी सरपंच संतोष वारे, मनसेचे शहर प्रमुख नानासाहेब मोरे, संभाजी होनप,राजु नालबंद उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रेणिकशेठ खाटेर म्हणाले की सावंत गटाचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून आपल्या सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सदैव पाठबळ मिळाले आहे.करमाळा शहरात व तालुक्यात सावंत कुटुंब प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःखात सहभागी होऊन अखंडपणे समाजसेवेचे महान कार्य करीत आहे. त्यांनी केलेल्या वाढदिवसाच्या सत्काराबद्दल आपली जबाबदारी वाढली असून येथुन पुढील काळात आपण सामाजिक कार्य करत राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी सांगितले.
