Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीय

भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा

करमाळा प्रतिनिधी देवळालीचे युवा नेते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाउपाध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. परंतु सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची घुसमट होत आहे. त्यांचा स्वभाव स्वाभिमानी वृत्तीचा असल्यामुळे भाजपची एक वेगळी प्रकारची विचारसरणीचे धोरण त्यांना पटत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा विचार भाजपचे तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड यांनी केला आहे. स्थानिक पक्षीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर गट तट हेवे दावे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढीसाठी कुठल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे पक्षीय कामकाजाला न्याय देऊ शकत नाही ठराविक व्यक्तिकेंद्रित भारतीय जनता पार्टी हा पक्ष असल्याने आपण अशा परिस्थितीमध्ये काम करु शकत नाही तसेच कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्व पातळ्यांवर मोठे नुकसान होत आहे .करमाळा तालुक्यात गटातटाचे राजकारण असल्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढीसाठी कुठल्याही प्रकारचे पोषक वातावरण नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष विस्तार झाला नाही ज्यांना काम करायचे त्यांना काम करून न देता पाय ओढण्याचे काम या पक्षात असल्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचारात असल्याची चर्चा आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group