करमाळा शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी कटीबद्ध – स्वातीताई फंड
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर परिसरातील नागरिकांचे आरोग्याची काळजी घेऊन पिण्याचे पाणी स्वच्छ व योग्य दाबाने मिळवून देण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले असून नागरिकांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रत्येक नगरसेविकेचे कर्तव्य असुन प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे मत प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका बांधकाम समिती सभापती सौ स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले करमाळा नगरपालिका बांधकाम सभापती स्वाती ताई महादेव आण्णा फंड पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइनचे काम फंड गल्ली यथे चालू असताना अचानक जावुन कामाची पाहणी केली काम कसे व योग्य दर्जेदार मटेरियल वापरतात का नाही याची स्वत जावुन पाहणी केली.त्याच्यां अशा कामामुळे त्या कायम चर्चेत असुन नागरिकांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या स्वातीताई फंड यांचे प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानुन त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी नगरसेवक अतुल फंड सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड उपस्थित होते कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन नगरपालिकेने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन नगरसेविका स्वातीताई फंड यांनी केले.
