शेटफळ सोसायटीत नागनाथ ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेटफळ विविध विकास कार्यकारी सेवा संस्थेच्या (सोसायटी) निवडणुकीत नागनाथ ग्रामविकास पॅनेलने विजय मिळवला आहे. तर नागनाथ परिवर्तन पॅनेलची एकही जागा आलेली नाही. विजयानंतर नागनाथ ग्रामविकास पॅनेलच्या समर्थकांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
करमाळा तालुक्यातील पोथरे, खातगाव, वाशिंबे व शेटफळ सोसायटीची निवडणूक आक्टोंबरमध्ये जाहीर झाली होती. यात पोथरे, खातगाव व वाशिंबेची निवडणूक बिनविरोध झाली होती. परंतु शेटफळ येथील सोसायटीची निवडणूक लागली होती. स्थानिक पातळीवर समन्वय न झाल्याने या सोसायटीच्या नऊ जागेसाठी मतदान झाले होते.तालुका पातळीवरील गटांचा विचार न करता जगताप व बागल गटातील समर्थकांनी एकत्र येऊन येथे पॅनल तयार केले होते. यामध्ये नागनाथ ग्रामविकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.या निवडनूकीत पांडुरंग कळसाईत, नंदकुमार सव्वालाख, सरकाळे गुंड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज न आल्याने यापूर्वीच ते बिनविरोध झाले होते. इतर नऊ जागेच्या झालेल्या निवडणुकीत बळीराम लबडे, दादासाहेब लबडे, तुकाराम नाईकनवरे, विलास पाटील, अंगद पोळ, ज्ञानदेव पोळ, विकास पोळ, भाऊसाहेब साबळे, निलेश गायकवाड हे विजयी झाले आहे.
