करमाळा भौसे रोड दुरूस्त करून डांबरीकरण करण्याची अमोल सुरवसे यांनी केली मागणी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा भौसे रोड अत्यंत खराब झाला असुन नागरिकांना खराब रस्ता असल्यामुळे वाहतूक करण्यासाठी अत्यंत त्रास होत आहे त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नारायण आबा पाटील गटाचे शिवसेना युवा कार्यकर्ते अमोल सुरवसे यांनी केली आहे. सदर रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब असल्यामुळे अपघात झाल्यामुळे नागरिकांची जीवितहानी होऊ शकते त्यामुळे नागरिकांची जीवीतहानी टाळण्यासाठी नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी सदर रस्ता तातडीने दुरुस्त करावा यासाठी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांनी लक्ष देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करून डांबरीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अमोल सुरवसे यांनी दिला आहे.
