करमाळा भोसे रोड दुरूस्त करून डांबरीकरण करण्याची भौसेचे उपसरपंच प्रितम सुरवसे यांनी केली मागणी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा ते भोसे रस्ता अत्यंत खराब झाला असुन नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने नागोबा मंदिर ते हिवरवाडी भोसे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी भोसे गावचे उपसरपंच प्रितम सुरवसे यांनी केली आहे.. पाऊसंमुळे सध्या रस्त्याला मोठे खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी विद्यमान आमदार व जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून डांबरीकरण करण्यात यावे नाहीतर आंदोलन करण्याचं इशारा भोसे गावचे उपसरपंच प्रितम सुरवसे यांनी दिला आहे
