यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी*
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. प्राचार्य मिलिंद फंड यांच्या हस्ते संपन्न झाली . यावेळी उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक व प्रबंधक कैलास देशमुख उपस्थित होते . यावेळी जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सरला चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जयंती साजरी करत असताना त्या थोरांच्या विचारांचे अनुकरण करणं गरजेचं असतं असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच एन.सी.सी. व एन.एस.एस. मधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी मानले.
