धनुष्यबाणाला मत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना मत – जिल्हाप्रमुख महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील 59 हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला असून प्रत्येक महिलेला पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवेत यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातून दिग्विजय बागल यांना लाडक्या बहिणी विधानसभेत नक्की पाठवणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला करमाळा झालेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.शिवसेनेच्या शहरप्रमुख कीर्ती स्वामी यांचे नेतृत्वाखाली येथे महिला मेळावा घेण्यात आला.करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी आमले तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे.तीर्थ दर्शन यात्रा मोफत केली आहे.दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर आहेत.मुलींना मोफत शिक्षण सुरू केले आहे.शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे.यावेळी बोलताना कीर्ती स्वामी म्हणाल्या की करमाळा शिवसेनेच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे.कोरोना काळात शिवसेनेने रुग्णाला मदत केली आहे.तालुक्यात शेकडो वैद्यकीय शिबिर घेतले आहेत.महेश चिवटे यांनी अनेक शहराचे व तालुक्याचे विकासासाठी कामी केली आहे.आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.महेश चिवटे यांना मानणारा बारा ते पंधरा हजाराचा मतदार बागलांच्या पाठीशी उभा राहणार आहे यामुळे धनुष्यबाणाचा विजय निश्चित आहे शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी सांगितले .
