स्व. डिगामामांच्या नंतर थांबलेला विकास पून्हा करायचा आहे मला कर्तृत्व सिध्द करण्यासाठी निवडून द्या दिग्विजय बागल यांचे मतदारांना आवाहन
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुभाष चौकात झालेल्या जाहिर सभेत महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल बोलत होते.रकमाळा तालुका रस्ते पाणी वीज याच समस्यात अजुनही गुरफटलेला आहे.करमाळा तालुक्याचे विकासाचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आरोग्यसेवा निर्माण कराव्या लागातील, वैद्यकीय, विधी महाविद्यालयां सारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिकसुविधा तालुक्यात निर्माण करायच्या आहेत. आमदार झालो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. मा. रश्मी दिदीसाहेब याच गटाच्या नेत्या असतील व मा. घुमरे सर हे मार्गदर्शक राहतील.स्व. मामांचा मुलगा म्हणून एक शेवटचे मत द्यावे, यापुढे कर्तृत्व सिध्द केले तरच मत मागण्यास येईल. बागल म्हणून र्सवसामांन्यांसाठी निःसंकोचपणे वेळ देईन.यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक विलासराव घुमरे सर , जिल्हाध्यक्ष महेश चिवटे,काझी सर, प्रदेश भाजपचे सचिव दिपक चव्हाण, श्री. कुंभार, श्री. भणगे काका, आर पीआय. जिल्हाध्यक्ष अर्जुनराव गाडे, रमेश आण्णा कांबळे. , सचिन घोलप, अमोल यादव, श्री. कानगुडे , शिलवंत साहेब, दत्ता वस्ताद, बाळू काका, प्रियंका गायकवाड, सौ. कांबळे, राहूल भैय्या नामदेवराव जगताप, प्रकाश दुधाळे,चेअरमन दिनेश भांडवलकर, श्री.भानवसे तसेच अन्य मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
