साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी.

करमाळा प्रतिनिधी. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान सन्मान आणि व्यवहारात न्याय मिळवून दिला.राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर आण्णाभाऊंना जातं. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्त करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नितीन झिंजाडे सदस्य प्रदेश कार्यकारिणी राष्ट्रवादी पदवीधर संघ, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,तालुका कार्याध्यक्ष अविनाश वाघमारे,शहर उपाध्यक्ष ओंकार पलंगे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते
