करमाळासकारात्मक

सरपंच म्हणून मिळणारे पाच वर्षाचे मानधन देणार जिल्हा परिषद शाळेला- सरपंच तानाजी झोळ

करमाळा – वाशिंबे येथील लोकनियुक्त नुतन सरपंच तानाजी(बापू) झोळ यांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंचासाठी मिळणारे पाच वर्षांतील मानधन जिल्हा परिषद शाळेला देण्याचा एक आदर्श निर्णय घेतला आहे.यावेळी झोळ यांनी बोलताना सांगितले राजकारणात मी ज्यांना नेता म्हणून काम करतो ते करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांनी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना आपले मानधन न घेता ते समाज हितासाठी वापरले तोच आदर्श घेत मी माझ्या पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळा मधील सर्व मानधन वाशिंबे जिल्हा परिषद शाळेसाठी देण्याचा निर्णय घेत आहे.ज्या शाळेत माझी लहान बहीण शिक्षण घेऊन राज्यसेवेतुन उत्तीर्ण होऊन केंद्रीय उपवनसंरक्षक (IFS)पदापर्यंत पोहचली.असेच विद्यार्थी या शाळेत घडावेत यासाठी सर्वोतोपरी मदत करणार आहे.तसेच भविष्यकाळात रस्ते,आरोग्य, पाणी,वीज यांबाबत ठोस निर्णय गावच्या विकासासाठी घेण्यात येतील असे सांगितले.  करमाळा तालुक्यातील विना मानधन सरपंच म्हणून आपले मानधन शाळेला देणारे पहिले सरपंच आहेत झोळ यांच्या निर्णयाचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीमधून स्वागत होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group