तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिनाथ कारखान्याचे चाक फिरले गळीत जोरदार सुरू दिवसाचा २७०० टनाचा टप्पा पार
करमाळा प्रतिनिधी तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिनाथ कारखान्याचे गळीत जोरदार सुरू दिवसाचा २७०० टनाचा टप्पा पार आदिनाथ कारखाना गेल्या तीन वर्षापासून सुरू होण्यासाठी संघर्ष करत होता तीन वर्षाच्या संघर्षानंतर आदिनाथ कारखाना जोमाने सुरू झाला असून आदिनाथ कारखान्यांनी सर्वाधिक 2700 टन गाळपाचा टप्पा काल पार केला असून आदिनाथ कारखाना तीन वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या पूर्व पदावर येत असून यंदाच्या हंगामामध्ये जरी गाळप कमी झाले असले तरी पुढील वर्षी आदिनाथ कारखाना चार ते पाच लाखाचा गळीताचा टप्पा नक्की पार करेल असे चित्र सध्या दिसत असून यंदा आदिनाथचे चाक फिरले व पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी आगेकूच करत आहे हे मोठे यश असून आदिनाथ महाराज यांची कृपा आदिनाथ कारखान्यावर झाली असून खऱ्या अर्थाने शेतकरी सभासद याचा हक्काचा कारखाना आदिनाथ म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्याचा आधारवड म्हणून भरारी घेणार या शंका नाही आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आदिनाथ बचाव समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत माजी आमदार नारायण पाटील बागल गटाचे नेत्या रश्मी बागल यांचे बचाव समितीचे हरीदास डांगे,प्रा.रामदास झोळ,डाॅ.वसंत पुंडे,यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले असून खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी वाचवण्यासाठी राजकारण एका बाजूला व समाजकारण एका बाजूला ही भावना ठेवून सर्व नेते मंडळींनी राजकीय परिपक्वता दाखवले असून करमाळा तालुक्यामध्ये विकासाचे राजकारण सुरू झाले आहे.आदिनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे संचालक नितीन जगदाळे डॉक्टर हरिदास केवारे, नानासाहेब लोकरे, दिलीप केकान, लक्ष्मण गोडगे, कार्यकारी संचालक अरूण बागनवर कदमसाहेब सर्व कर्मचारी व कामगार वर्ग तसेच सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभत असून आदिनाथ कारखाना पुन्हा गत वैभव प्राप्त करून करमाळा तालुक्याचे नंदनवन करण्यास समर्थ ठरणार आहे
