Sunday, April 20, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

गटारीचे पाणी रस्त्यावर डासाचा प्रार्दृभावामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता नगरपालिकेने तात्काळ स्वच्छता फवारणी करावी -मा. नगरसेविका राजश्री माने

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे गटारीतील पाणी  रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा येतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे.

करमाळा शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. करमाळा शहरातही जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचे पाणी गटारीत न बसल्याने रस्त्यावरून वाहिले आहे. त्यात कचरा अडकतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिकेने याकडे गांभीर्याने पहावे. डासांचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरित धुराडी मशीनद्वारे फवारणी करून घ्यावी, अशी मागणी नगरसेविका माने यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group