आयुर्वेदिक व पंचकर्मचा नक्कीच नागरिकांना फायदा होणार .. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील
करमाळा प्रतिनिधी
आयुर्वेदिक व पंचकर्म उपचाराचा नक्की नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदा होणार आहे . या उपचार पध्दतीचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कविटगाव तालुका करमाळा येथील
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. स्वप्नील लोणकर यांच्या इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील श्री विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कवीटगावचे सरपंच शिवाजी सरडे, उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक सतीश व्यावहारे, उद्योजक गोरख क्षीरसागर, विजय म्हेत्रे, प्रगतशील बागायतदार महादेव खराडे, डॉ. अजित भोसले, डॉ. अमोल रासकर, डॉ. नामदेव गार्डे, डॉ. प्रताप कदम, डॉ. संतोष नगरे, डॉ. अमोल शेंडे, डॉ. सुहास सातपुते, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. सुदीप ओहोळ, डॉ. विशाल जगदाळे, डॉ. ज्योतीराम टकले, डॉ. वैभव निर्मळ, डॉ. विनोद कुबेर आदी उपस्थित होते.
सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले की , ‘पुणे येथील प्रसिद्ध राजवैद्य समीर जमदग्नी यांच्याकडे मी स्वतः आयुर्वेदिक उपचार घेतलेले आहेत. तेथेच डॉ. स्वप्नील लोणकर यांनीही संपूर्ण आयुर्वेदाचे व पंचकर्माचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडेच दोन वर्ष त्यांनी उपचाराचा सराव केला आहे. आता त्यांनी इंदापूर येथे क्लिनिक सुरु केले आहे. हे विशेष आहे. याचा नागरिकांना उपयोग होणार आहे. डॉ. जमदग्नी यांचे आयुर्वेदातील योगदान हे वखाणण्याजोगे आहे, असेही माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.
डॉ. लोणकर यांनी यावेळी आयुर्वेदिक व पंचकर्म याबद्दल माहिती सांगितली. आयुर्वेदाचे वाढते महत्त्व डाॅ. लोणकर यांनी पटवून दिले. माजी सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी औषधी वनस्पती पासून बनवलेल्या औषधालयाला भेट घेऊन औषधाची माहिती घेतली. यावेळी उपस्थितांचे स्वागत शंकर लोणकर व वंदना लोणकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजित भोसले यांनी केले तर आभार धंनजय राऊत यांनी मानले.
