करमाळा तालुक्यातील घारगावचे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे यांचेकडून कोविड योद्धा म्हणून करणार सन्मानित
करमाळा प्रतिनिधी
भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे (रजि .नं. महा/ 432- 99/ पुणे )यांचेकडून करमाळयाचे घारगावचे सुपुत्र संजय सरवदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
कोरोना काळात बिकट अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता covid-19 विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम केले गोरगरिबांना धान्याचे वाटप, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप, व गोरगरिबांना जेवण वाटप, कोरोना विषयी जन जागृती काही हॉस्पिटलमध्ये पेशंटला मदत अशा अनेक प्रकारच्या समाजसेवा त्यांनी कोरोना काळामध्ये बजवल्यामुळे घारगाव येथील श्री संजय सरवदे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री शिवदास भाऊ उबाळे माजी सरपंच वाघोली व मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रदीप दादा उबाळे यांनी सांगितले.
