मांगी गावातील देवानंद भोसले यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत मिळावलेल्या यशाबद्दल बागल गटाच्यावतीने सत्कार

करमाळा प्रतिनिधी मांगी गावातील देवानंद ज्ञानेश्वर भोसले या विद्यार्थ्यांने इयत्ता दहावीमध्ये 87.60% इतके गुण घेऊन उत्तीर्ण झाला. देवानंद हा पारधी समाजाचा मुलगा आहे, लोकांच्या शेतात कष्ट करुन त्याने हे यश मिळवले आहे. अंगात भिणलेल्या जिद्दीच्या जोरावर पारधी समाजाच्या या मुलाने नक्कीच कौतुकास्पद यश मिळावले आहे. करमाळा तालुक्याचे लोकनेते स्व. दिगंबर मामा बागल यांनी याच देवानंद भोसले यांच्या आजोबाला म्हणजेच मच्छिंद्र भोसले यांना खुल्या वर्गाचे मांगीचे सरपंचपद देत जिल्ह्यात आदर्श निर्माण केला होता. देवानंदचा सत्कार करमाळा तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांनी केला. जाती-पाती पेक्षा माणसूकी जपणारा बागल परिवार तालुक्याला आपला वाटतो तो याच कारणाने. पुढील शिक्षणासाठी नक्कीच देवानंदला मदत करु असे दिदींनी सांगितले. यावेळी तालुक्याच्या माजी आमदार शामल मामी बागल आणि ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांनी ही देवानंदला शुभ आशिर्वाद दिले आहे.
