करमाळासहकार

नामदार तानाजी सावंत मुळेच आदिनाथ कारखाना वाचला बचाव समितीची भूमिका महत्त्वाची ठरली-प्राध्यापक रामदास झोळ

करमाळा (प्रतिनिधी)आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी नामदार तानाजीराव सावंत यांनी स्वतःच्या खिशातले बारा कोटी रुपये दिले व कारखाना वाचवला खऱ्या अर्थाने आदिनाथ कारखाना वाचवण्याचे श्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनाच असून यात प्रमुख भूमिका बचाव समितीच्या बचाव समितीचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही चे बचाव समितीचे सदस्य दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक रामदास झोळ यांनी व्यक्त केलीआदिनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावलेल्या आदिनाथ बचाव समितीच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम पुढे फुटजळगाव येथे ठेवण्यात आला होता.बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे प्राचार्य जयप्रकाश बिले आदींचा सत्कार करण्यात आलायावेळी बोलताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की कारखान्याचे खाजगीकरण झाले असते तर एक पुढारी सुद्धा निवडणुकीला इच्छुक राहिला नसता आता बचाव समितीमुळे कारखाना सहकार तत्त्वावर राहिल्यामुळे अनेकांना स्वतःच्या राजकारणासाठी आदिनाथ ची गरज वाटू लागली आहे.आदिनाथ चा होणारा संचालक आजिनाथ मधून पैसे घरी घेऊन जाणारा नसावा तर आदिनाथ ला अडचणीत आल्यावर घरून पैसे आणून देणार असावाआता अनेक जण म्हणतात की माझ्यामुळे कारखाना वाचला हे चुकीचे आहे करमाळा तालुक्यातील जनता सुज्ञ आहेबचाव समितीच्या आवाहनानुसार हा आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी व खऱ्या अर्थाने कारखान्याची काळजी असेल तर प्रत्येक गटाच्या पुढाऱ्यांनी आपल्या गटातील दोन-तीन नावे संचालक पदासाठी सुचवावी व कारखाने बिनविरोध करावा.आतापर्यंत कारखान्याचा वापर राजकारणासाठी केला मात्र आता कारखानाचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याची वेळ आली आहेबचाव समितीने जी आव्हान केले आहे आदिनाथ कारखाना बिनविरोध करावा या आमच्या भूमिकेवर तालुक्यातील सर्व राजकीय गटाने आपली मत व्यक्त करावे असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांनी केलेे.

 

 

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!