पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा
करमाळा प्रतिनिधी पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा 73 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात शनेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला. या वाढदिवस संमारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल उपस्थित होते. वाढदिवसानिम्मित विष्णू रंदवे यांना केक भरवुन सत्कार करून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी दिग्विजय बागल म्हणाले की विष्णू रंदवे सर्वसामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्व असून भविष्यात आपण त्यांना योग्य वेळी तालुकास्तरावर संधी देणार आहोत. यावेळी सूर्यकांत पाटील शाहू दादा फरतडे शंभुराजे फरतडे बंडू शिंदे शहाजी धेंडे राजाभाऊ कदम. शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर सुधीर काळे अविनाश गाडे बप्पा शिंदे विलास महाराज शिंदे प्रेमराज शिंदे यांनी भाषणे केली. यावेळी माजी सभापती सोपान काका शिंदे माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार राजाभाऊ जगताप पत्रकार दिनेश मडके जयंत दळवी, राजेश गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते भाजपाचे नरेंद्रसिंह ठाकुर पोथरेचे सरपंच धनंजय झिंजाडे पत्रकार हरिभाऊ हिरडे नानासाहेब पठाडे रघुवीर झिंजाडे ज्ञानदेव नायकोडे आबासाहेब भांड आधी मान्यवराचे उपस्थितीमध्ये विष्णू रंदवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला या वाढदिवसास पोथरे पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व पंचक्रोशीतील नागरिकांना मिस्टाष्न भोजन देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.नानासाहेब पठाडे तर आभार शांतीलाल झिंजाडे यांनी मानले.
