आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे नेरले गाव पाणीदार होणार …सरपंच सौ.प्रतिभा समाधान दौंड
करमाळा प्रतिनिधी
नेरले येथील जुना साठवण तलाव हा दहीगाव उपसा सिंचन योजना तसेच कोळगाव उपसा सिंचन योजना या दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रामध्ये येत नसला तरीही ग्रामपंचायतच्या आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदार संजयमामा शिंदे यांनी जुन्या तलावासाठी 2020 पासून सातत्याने दहीगाव योजना आणि कोळगाव योजनेवरून ओव्हर फ्लो आवर्तनाचे पाणी दिलेले आहे. त्यामुळे जुन्या साठवण तलावावर आधारित ऊस क्षेत्राची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली असून जवळपास 400 हेक्टर क्षेत्र ऊस पिकाच्या लागवडीखाली आलेले आहे . जुन्या नेरले तलावाचा फायदा नेरले या गावाबरोबरच सालसे ,आळसुंदे आणि वरकुटे या गावांनाही होतो.
स्वतंत्रपणे नेरले गावासाठी 2012 साली नवीन साठवण तलावाचे काम सुरू झाले होते. 50 टक्के काम झाल्यानंतर या तलावाचे काम थांबलेले होते. 2020 मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांना आम्ही साकडे घातले .त्यानुसार त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग सोलापूर यांच्याकडे बैठक लावली आणि त्यानंतर कामाने गती घेतली .
2022 मध्ये या साठवण तलावाचे काम पूर्ण झाले. विशेष महत्त्वाचे बाब म्हणजे याच वर्षी निसर्गाच्या कृपेने हा नवीन तलाव 100 टक्के भरला असून तो ओव्हर फ्लो झाला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांचे मुळे नेरले गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे. दोन्ही तलावामुळे 600 हेक्टर क्षेत्र बारमाही पिकाखाली येणार असून येणाऱ्या काळात बारमाही पिकांखालील क्षेत्र आणखी मोठ्या प्रमाणावर वाढलेले निश्चितच दिसेल .त्यामुळे सर्व नेरले ग्रामस्थ आमदार संजयमामा शिंदे यांचे आभारी आहेत अशी भावना सरपंच सौ. प्रतिभा समाधान दौंड यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट …
नवीन नेरले तलाव – ठळक बाबी-
तलावाची लांबी – 465 मीटर.
उंची – 12 मीटर.
सांडव्याची लांबी- 118 मीटर.
तलावामुळे सिंचनाखाली येणारे क्षेत्र- 207 हेक्टर .
एकूण पाणीसाठा – 37 दशलक्ष घनफूट.
तलावामुळे बुडीत झालेले क्षेत्र – 53 हेक्टर भूसंपादन वगळता कामावर झालेला खर्च – 5 कोटी रुपये.
