करमाळा

आदिनाथचे माजी संचालक ॲडव्होकेट दत्तात्रय सोनवणे यांचे सुपुत्र हर्षल सोनवणे याची नवोदयसाठी निवड

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा प्रतिनिधी पांगरे, ता. करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कु. हर्षल दत्तात्रय सोनवणे याची केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापुर इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे. यासाठी त्याला मार्गदर्शन वर्गशिक्षक अतुल घोगरे, मुख्याध्यापक संजय जाधव, मार्गदर्शक शिक्षिका सौ. सारीका चेंडगे, सचिन चेंडगे, नम्रता क्षीरसागर, गुरुकुलचे संस्थापक नितीन भोगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. आदिनाथ कारखान्याचे मा. संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे व पांगरे गावचे सरपंच प्रा.डाॅ. विजया सोनवणे यांचा मुलगा आहे. मा.आमदार शामलताई बागल, मा. विलासराव घुमरे सर, मा. रश्मीदिदी बागल, मा. दिग्विजय बागल यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group