करमाळा शहरासह तालुक्यात खूप मोठा पाऊस झाल्यामुळे शाळेंना सुट्टी दयावी – जगदिश अग्रवाल शहराध्यक्ष भाजप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरासह तालुक्यात खूप मोठा पाऊस झाला आहे ओढे नाले गच्च भरले आहे.अनुचित घटना घडु नये म्हणून तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवावे असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केले आहे. त्यांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी पाटील यांना दूरध्वनीवरून विनंती केली आहे. याबाबत लगेचचसर्कुलर काढले जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. करमाळा तालुक्यात खूप ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाट,वीजांचा आवाज येत होता.गुरसळी येथे पुलावरून एक व्यक्ती वाहून गेला आहे असे समजते, शहरातील रस्तेही गच्च भरून वाहत आहे.उद्याही हवामान खात्याने खूप पाऊस पडेल असे सांगितले आहे यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी उद्या शाळेला सुट्टी राहील याबाबतगटविकासअधिकारी,गटशिक्षणाधिकारी,मुख्याधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे असे ही अध्यक्ष आग्रवाल यांनी सांगितले आहे.
