जलजीवन पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे राबविताना प्रत्येक नागरिकाने सतर्कतेने लक्ष देणे गरजेचे आहे तरच योजना यशस्वी होतील- ॲड. अजित विघ्ने
*
करमाळा प्रतिनिधी जलजीवन मिशन अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भरमसाठ निधीतुन गावोगावी पाणीपुरवठा योजना साकारणार असुन, करमाळा तालुक्यातील अनेक गावात योजनांना मंजुरी मिळालेली आहे. यासाठी अनेक ठेकेदारांनी टेंडर प्रक्रीयेमधे सहभाग घेत बीलो मधे कामे घेतलेली आहेत. वस्तुतः जलजीवन योजनेची कामे चांगली क्वालिटी ची होणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहीजे. व एक जबाबदार नागरिक म्हणुन गावच्या या विकासकामावर लक्ष ठेवुन चांगले काम करून घेतले पाहीजे. पाणी हे प्रत्येकाचे जीवनाचा अविभाज्य घटक असुन, शुद्ध पाणीपुरवठा मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. २५ ते३० वर्षापुर्वीच्या पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे नवी जलजीवन योजना प्रभावीपणे राबणे हे शासनाचे धोरण आहे. यासाठी गावोगावी कोट्यावधी रुपयांच्या योजना मंजुर आल्या असुन, या योजना व्यवस्थित आराखडयाप्रमाणे झाल्या पाहीजेत. यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहील्यास आपआपल्या गावची ही महत्वाची योजना प्रभावीपणे राबणार आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणुन या योजनेकडे पहावे असे मत युवक नेते ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे.